पादचाऱ्यांचे प्रश्न
- बर्याच ठिकाणी पदपथ नाहीत.
- रस्त्यावर चालताना असुरक्षित वाटते
- रस्ता ओलांडणे खूप कठीण आहे
- पदपथांवर अतिक्रमणांची संख्या जास्त
- बेकायदेशीर पार्किंग आणि पदपथांवर वाहन चालविणे
- खांब, इलेक्ट्रिक बॉक्स, हँगिंग केबल्स इत्यादी पदपथांवर अडथळे.
- शौचालय, डस्टबिन, बसण्यासाठी शेड असलेले बेंच, पथदिवे इत्यादी मूलभूत सुविधा पदपथांवर नाहीत.
- असमान पृष्ठभाग, खंडित आणि गलिच्छ पदपथ
- शहराच्या रस्त्यावर चालणे हा एक सुखद अनुभव नाही
- ट्राफिक शिस्तीचे पालन नाही.
पादचारी या समस्यांचा सामना का करीत आहेत?
काही कारण खाली दिली आहेत-
- कोणतेही योग्य नियोजन नाही
- पदपथांची अनियमित आणि असमाधानकारक देखभाल
- रस्त्याचे डिझाइन योग्य पद्धतीने नसतात आणि त्या पादचाऱ्यांना दुर्लक्ष केले जाते किंवा फारच कमी महत्त्व दिले जाते.
- पादचाऱ्यांसाठी सिग्नल, वेळ पुरेशी नसते.
- अंमलबजावणी खूप कमकुवत आहे
- रस्ता विभाग आणि इतर संबंधित विभागांमध्ये समन्वयाचा अभाव
- रस्त्याचे डिझाइन आणि नियोजन प्रक्रियेत शहर रचनाकार नसतात.
- आणि सर्वात महत्वाचे – आपण कधीही आपल्या मागण्या मांडत नाही
म्हणून, बोला, आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवा
- संपूर्ण शहरात अडथळा मुक्त पदपथ
- प्रमुख चौकात चालू स्थितीमधील पादचारी सिग्नल
- शहरभर चांगल्या प्रतीच्या वापरण्यायोग्य व सुरक्षित पादचारी सुविधा
- फूटपाथवर वापरता येतील असे शौचालय, कचरापेटी, शेड्स असलेले बेंच, पथदिवे इत्यादी मूलभूत सुविधा असाव्यात.
- प्रत्येक सिग्नलवर सर्वांना दिसतील असे व्यवस्थित मार्क केलेले झेब्रा क्रोसिंग असावे.
- शहरातील प्रत्येक रस्त्यावर सुरक्षित क्रॉसिंग आणि शहरातील प्रमुख रस्त्यावर मिडब्लॉक क्रॉसिंग असावे
- फूटपाथवर बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या वाहनांवर कडक कारवाई करावी.
आमच्यासोबत सहभागी व्हा
- STEP चे सदस्य बना
- तुमच्या परिसरातील पादचाऱ्यांच्या संदर्भातील प्रश्न उपस्थित करा
- समाजात पादचारी प्रश्नांवर जागृकता निर्माण व्हावी यासाठी तुमच्या परिसरात मिटिंगचे आयोजन करा व त्यात आम्हालाही निमंत्रित करा.
- STEP च्या कार्यक्रमात/ उपक्रमांमध्ये सहभागी व्हा.