परिसर संस्थेने STEP(Steps Toward Empowering Pedestrian) हा मंच उभारला आहे. पादचाऱ्यांनी एकत्रित येऊन त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवावा, आपल्या मागण्या मांडाव्यात व त्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून या संघटनेची सुरुवात करीत आहोत. धोरणात पादचाऱ्यांचे हक्क नमूद केलेले आहेत ते प्रत्यक्ष रस्त्यावर येण्यासाठी पादचाऱ्यांनी स्वतःचा आवाज उठवला पाहिजे व आपले प्रश्न एकत्र येऊन प्रशासनाकडे मागणी केली तरच पादचार्यांचे प्रश्न सुटतील.
शहरी भागात प्रत्येक प्रवासी त्यांच्या प्रवासाच्या काही टप्प्यावर पादचारी असतात. म्हणजे वाहनातून उतरल्यावर काही ठराविक अंतर हे प्रत्येकाला चालत जावे लागते. आणि म्हणूनच शहरी वाहतुकीत पादचारी सुविधा महत्वाची आहे. वाहनांची संख्या वाढणे आणि पादचार्यांकडे शासनाचे लक्ष नसणे. फुटपाथ उपलब्ध नसणे, पादचारी सोयी सुविधा नसणे, जीविताची सुरक्षा नसणे यामुळे लोकांचे पायी चालणे शहरात कमी झालेले दिसते. राष्ट्रीय नागरी परिवहन धोरण (National Urban Transport Policy) आणि पुण्यातील सर्वंकश वाहतूक आराखडा (Comprehensive Mobility Plan) यांनी सार्वजनिक वाहतूक, चालणे आणि सायकल चालवण्यास योग्यतेने प्राधान्य दिले आहे. शहरांद्वारे विकसित केले जाणारे विविध शहरी परिवहन प्रकल्प NUTP प्रमाणे होत आहेत आहेत ना हे सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालयाने मार्च २००७ च्या परिपत्रकात वाहनांपेक्षा लोकांच्या गतिशीलतेवर लक्ष केंद्रित करणारे शहरांचे सर्वंकश वाहतूक आराखडा तयार करण्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार पादचारी, मशिनिकृत वाहनविरहीत परिवहन (सायकलस्वार, पादचारी), सार्वजनिक वाहतुकीच्या सर्व पद्धतींना प्राधान्य दिले आहे. या धोरणांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात ही धोरणे अंमलात आणताना दिसत नाहीत. म्हणून पादचार्यांकडून सुरक्षा, सोयी आणि पादचारी मार्गांच्या चांगल्या पायाभूत सुविधांसाठी मागणी वाढविणे महत्त्वपूर्ण आहे. पादचाऱ्यांसाठी धोरण असतांना हि प्रत्यक्षात अनेक अडचणींना पायी चालणऱ्यांना सामोरे जावे लागते. यासाठीच पादचाऱ्यांसाठी अभियान राबवण्याची गरज परिसर संस्थेला वाटली. यामध्ये आम्ही सर्वप्रथम पुणे शहरात काय अडचणी येत आहेत व पादचारी अभियानामध्ये सहभागी होण्यास लोक उत्सुक आहेत कि नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
यासाठी परिसर संस्थेने पुण्यातील ४१ प्रभागांमध्ये १,००० पादचाऱ्यांच्या सर्वेक्षणाद्वारे त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. प्रत्येक प्रभागामध्ये कमीत कमी १५ ते २५ पायी चालणाऱ्या व्यक्तींकडून प्रश्नावली भरून घेतली. हे सर्वेक्षण करण्यामागे हेतू होते कि, पादचाऱ्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे ते जाणून घेणे. पादचाऱ्यांची आपल्या प्रश्नावर आवाज उठवण्याची तयारी आहे कि नाही हे पाहणे. पादचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी नागरिकांसोबत जोडले जाणे. आणि पादचारी अभियानासाठी विविध गट व व्यक्तींसोबत जोडले जाणे.
परिसर संस्थेतील कार्यकर्त्यांनी या सर्वेक्षणात पादचाऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठी एक प्रश्नावली तयार केली होती. चालणे, सुरक्षितता, चालताना जाणवणाऱ्या समस्या, फुटपाथ संदर्भात, क्रॉसिंग संदर्भात असे २० प्रश्न विचारले होते. प्रश्नावली ही पादचाऱ्यांना समजत आहे न किती वेळ जात आहे, यासाठी प्रश्नावलीचे आधी एक चाचणी करून पुन्हा त्यामध्ये बदल करण्यात आले.
हे सर्वेक्षण १,००० पादचाऱ्यांसोबत ४१ म्हणजे सर्वच प्रभागात घेतले गेले. पुण्यातील सर्व ४१ प्रभाग निवडण्यामागे कारण हे होते कि सर्व ठिकाणचे प्रतिनिधित्व यात यावे व जर एखाद्या प्रभागाबद्दल काही समस्या सर्वेक्षणातून पुढे आल्या तर त्या प्रभागातील नगरसेवकांच्या पुढे त्या आणता येतील, असा विचार यामागे केलेला होता.
हे सर्वेक्षण करताना random sampling या संशोधन पद्धतीचा यात वापर करण्यात आला. जरी रस्त्यावरील पायी चालणाऱ्या कोणत्याही व्यक्ती ज्या प्रश्नावली भरण्यास होकार देतील व वेळ देतील अश्याकडून जरी भरून घेतले असले तरी स्त्री-पुरुष व विविध वयोगटाचे किमान समान प्रतिनिधित्व यात आणण्याचा प्रयत्न केला होता.
या सर्वेक्षणासाठी विद्यार्थी सहायक समिती येथील कॉलेज मध्ये जाणाऱ्या १३ मुलीं निवडल्या आणि त्यांनी हे सर्वेक्षण प्रत्यक्षात पूर्ण केले. त्यासाठी आधी त्यांचे प्रश्नावली व विषयाला घेऊन एक मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. त्यात त्यांना प्रश्नावली भरून कशी घ्यायची तसेच दोघी-तिघींमध्ये प्रभाग वाटून दिले. नंतर त्यांचा Whats App गट करून त्या जिथे जात आहेत. तिथले फोटो तसेच तिथला परिसर share करण्यास सांगितले. सातत्याने त्यांना भेटून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्या व्यवस्थित प्रश्नावली भरून घेत आहेत ना याचे mointoring करण्यात आले.
सर्वेक्षणातून पुढे आलेल्या गोष्टी अश्या, ८३ % पादचारी हे रोज चालतात. यामध्ये रोज चालणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा 5 % अधिक आहे. वैयक्तिक वाहन वापरत नाही अश्या लोकांचे प्रमाण ४७ % इतके आहे. यामध्ये ६२ % महिला या कोणतेही वैयक्तिक वाहन वापरत नव्हत्या. यामध्ये आम्हाला असे कळून आले कि जेवढे पादचारी आमच्याकडून या सर्वे मध्ये सामील झाले त्यात महिलांकडे वैयक्तिक वाहन नसल्याचे प्रमाण दिसून आले. त्यामुळे या महिलांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व पायी चालण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.
फुटपाथ वापरू न शकण्याच्या कारणांमध्ये फुटपाथ वर वाहनांचे पार्किंग असण्याचे प्रमाण जास्त होते. त्यानंतर अडथळे जास्त असल्याचे दिसून आले. फुटपाथवर बांधकामाच साहित्य इलेक्ट्रिक पोल बॉक्स इ; अनेक अडथल्यांमुळे पादचाऱ्यांना चालण्यास त्रास होतो. त्यानंतर विक्रेते, असमान व अर्धवट फुटपाथ यांचा हि त्रास होतो. याव्यतिरिक्त काहीजणांनी अस्वछता, जाहिरातींचे बोर्ड, फुटपाथ वरून गाड्या चालवणे याबद्दल सांगितले. या इतर कारणांमध्ये महत्त्वाच कारण होत अनेक ठिकाणी फुटपाथच उपलब्ध नाहीत.
जनता वसाहत–दत्तवाडी, वडगाव-धायरी-सनसिटी, कळस-धानोरी या प्रभागांमध्ये अधिक लोकांनी फुटपाथ उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. सर्वेक्षणातून असे दिसून आले कि ज्या प्रभागांमध्ये फुटपाथ नाहीत, असे पादचारी म्हणत आहेत त्या प्रभागांमध्ये चालण्यास सुरक्षित वाटत नाही असे हि म्हणनाऱ्यांचे प्रमाण जास्त होते. फुटपाथ असल्यामूळ पादचारी वाहनांच्या संपर्कात येत नाहीत व त्यांना सुरक्षितता जाणवते. व फुटपाथ उपलब्ध नसतील तर चालणार्यांना अपघाताची भीती सतत वाटत राहते. वृद्ध व्यक्तींना शहरात चालताना सुरक्षित वाटत नसल्याचे दिसून आले आहे. रस्ता क्रॉस करताना सिग्नलला देखील त्यांना सुरक्षित वाटत नाही. शहरात चालताना सुरक्षित न वाटण्याच्या कारणांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त कारण हि वाहनांशी संबंधित होती जसे कि वाहनांचा वेग, वाहनांची गर्दी, अपघाताची भीती, नियम न पाळणे इ; पादचार्यांनी त्यांना जाणवणाऱ्या समस्यांबद्दल कधी तक्रार केलेली नाही असे म्हटले आहे. यामध्ये सर्वात जास्त लोकांनी माहिती नसल्याने तक्रार केली नाही असे म्हटले आहे. काहीना त्याबाबत तक्रार करावी असे वाटले नाही म्हणजे अनेकांनी हि समस्या आहे हे सुद्धा गृहीत धरलेले नव्हते.
स्त्रियांना सर्वे मध्ये सुरक्षिततेसंदर्भात प्रश्न विचारलेला निम्या पेक्षा जास्त महिलांनी सुरक्षित वाटत असल्याचे म्हटले आहे. पण त्यात ३२% महिलांनी सुरक्षित वाटत नसल्याचे म्हटले आहे. लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन, रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असतात, काही ठिकाणी पथदिवे नाहीत. अशी हि कारणे महिलांनी सांगितली.
शहरात चालण्यासाठी कोणत्या मूलभूत सोयी सुविधा असल्या पाहिजेत यामध्ये कचरा पेटी (७४%), शौचालय(७३%), बसण्यासाठी सोय (६७%), अखंड व अडथला नसलेले फुटपाथ (६७%) असे मत पादचार्यांनी नोंदवलेले आहे. पादचाऱ्यांसाठी त्यांच्या प्रश्नावर अभियान राबवले पाहिजे का यावर ८६% पादचार्यांनी राबवायला हवे असे उत्तर दिले आहे.
याच पार्श्वभूमीवर परिसर संस्थेने STEP(Steps Toward Empowering Pedestrian) हा मंच उभारला आहे. पादचाऱ्यांनी एकत्रित येऊन त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवावा, आपल्या मागण्या मांडाव्यात व त्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून या संघटनेची सुरुवात करीत आहोत.
धोरणात पादचाऱ्यांचे हक्क नमूद केलेले आहेत ते प्रत्यक्ष रस्त्यावर येण्यासाठी पादचाऱ्यांनी स्वतःचा आवाज उठवला पाहिजे व आपले प्रश्न एकत्र येऊन प्रशासनाकडे मागणी केली तरच पादचार्यांचे प्रश्न सुटतील. एकट्या-दुकट्या व्यक्तीने तक्रार केली तर त्याकडे तितके लक्ष दिले जात नाही. कोणताही प्रश्न शासनासोबत पोहचवताना व आपल्या मागण्या मान्य करून घेताना एकट्याने पाठपुरवठा करणे हे अवघड जाते. तेच जर सर्व प्रश्न एकत्रित केले व संघटनेच्या माध्यामतून त्याचा पाठपुरवठा केला तर ते प्रश्न लवकर सोडवले जाऊ शकतील. पादचाऱ्यांनी आपल्या प्रश्नासाठी एकत्र यावं, आपले प्रश्न, मागण्या घेऊन अधिकारी व लोकप्रतिनिधींकडे जावे. पादचाऱ्यांचे प्रश्न सोडवले गेले, तर वाहतूक व्यवस्थेतील पादचाऱ्याचे स्थान नक्कीच सुधारेल. व आपली शहरे खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक विकासाकड वाटचाल करतील. पादचाऱ्यांच्या ह्क्क्कांसाठी व सुरक्षिततेसाठी अभियान राबवले जात आहे व त्यामार्फत पादचाऱ्यांनी कायम स्वतःच्या हक्कांवर कार्यरत राहण्यासाठी STEP हा मंच पादचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुरु होत आहे.
STEP हा मंच रस्त्यावर चालणाऱ्या लोकांचे हक्क त्यांना मिळावेत यासाठी निर्माण करण्यात आला आहे. पायी चालणाऱ्या लोकांना सुरक्षा व योग्य त्या सर्व सोयी-सुविधा असल्या पाहिजेत.
पादचाऱ्यांचे हक्क कोणते–रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तींना जीविताची सुरक्षितता व बिनादिक्क्त चालता येण्याची सुविधा असावी.
सर्व रस्त्यांवर चालण्यासाठी अखंड व अडथळा नसलेले फुटपाथ असावेत.
वाहने व इतर अडथळे यांचा रस्ता क्रॉस करताना पादचार्यांना त्रास होऊ नये. जीविताची सुरक्षितता मिळावी.
शौचालय, पथदिवे, बसण्यासाठी सोय या सर्व पादचाऱ्यांना उपलब्ध असायला हव्यात.
स्वच्छ व दुर्गंधी मुक्त फुटपाथ असायला हवेत.
अपंग व्यक्तींना हि वापर करता येतील असे फुटपाथ असावेत.
STEP चे ध्येय व उद्दिष्ट्ये –
ध्येय- पादचारी व्यक्तींना सुरक्षितता व चांगल्या सोयी-सुविधा मिळून देण्यासाठी पादचाऱ्यांना संघटीत करून कार्यरत करणे.
उद्दिष्ट्ये- पादचाऱ्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी एक मंच उभारणे.
पादचाऱ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे.
पादचारी हक्कांची मागणी करण्यासाठी एक मजबूत लोक संघटना तयार करणे.
पादचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी सबंधित प्रशासकीय विभाग व अधिकाऱ्यांसोबत पाठपुरवठा करणे.
पादचाऱ्यांचे प्रश्न माध्यमांमध्ये आणून लोकप्रतिनिधींचे त्याकडे लक्ष वेधून घेणे.
पादचाऱ्यांच्या हक्कांसाठी दबावगट म्हणून कार्यरत राहणे.
शहरनियोजन व वाहतूकप्रकल्प हे पादचारी स्नेही होत आहेत ना याची खात्री करणे.
पादचारी स्नेही शहरे का असायला हवीत? नागरीकांच आरोग्य चांगल रहाव. चालण्याने इंधनाची बचत व्हावी आणि प्रदूषण कमी होण्यास मदत व्हावी त्यामुळे चालणे हे पर्यावरणपूरक आहे. लहान मुले व वयस्करांना सुरक्षित व आरामदायी चालता यावे यासाठी, चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व पादचारी व्यवस्था या शहरविकासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. रस्ते, बगीचे, चौक ह्या जागा सार्वजनिक जागा म्हणून आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. ह्या आपल्या लोकशाहीच्या जागा आहेत जिथे विविध स्तरातील माणसे एकत्र येतात. रस्त्यांवरील विविध गोष्टींमुळ आपली शहर जिवंत आणि जगण्यालायक बनतात. रस्ते सर्वाना वापरता येतील, सुरक्षित व सोयीस्कर असतील हि शहरातील रस्त्यांची महत्त्वाची व मुख्य जबाबदारी असते.
चालणे हे रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग असला तरी नागरिक त्यावर जास्त विचार करत नाहीत किंवा बोलत नाहीत. शहरी वाहतुकीचे प्रश्न हे कायम ट्रफिक रिपोर्ट्स, गर्दी, पार्किंग चे प्रश्न इ; यांनीच व्यापलेले असतात. यामध्ये पादचार्यांना येणाऱ्या समस्स्यांबद्दल कधीच चर्चा केली जात नाही.
STEP चे उपक्रम – पादचाऱ्यांसाठी जनजागृती व अभियान राबविणे, संघटनात्मक बांधणी, क्षमता बांधणी, संशोधन व पाठपुरावा करणे.
आमच्याशी कसे जोडले जाऊ शकता? तुमच्या भागातमध्ये पादचाऱ्यांना काही अडचन जाणवत असेल व मार्गदर्शन हव असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. पादचाऱ्यांच्या हक्कासाठी तुम्हाला काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही आमच्या (STEP) संघटनेचे सदस्य होऊ शकता. यासाठी तुम्ही आमच्या stepwalk.in या website वर जाऊन सदस्य होण्याचा फॉर्म भरू शकता. किंवा आमच्याशी संपर्क करू शकता. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जर तुम्हाला याबाबतीत जागृती व्हावी असे वाटत असेल तर तुमच्या सोसायटीत मध्ये किंवा तुमच्या मित्रमंडळासोबत मिटिंग घेण्यासाठी तुम्ही आम्हाला आमंत्रित करू शकता. या विषयावरच्या आमच्या अभियानाच्या विविध कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
तर या आमच्या पादचारी अभियानात आमच्याशी जोडलेले रहा. सहभागी व्हा. संपर्कासाठी आमचा पत्ता- परिसर, यमुना, आयसीएस कॉलनी, गणेशखिंड रोड, पुणे, फोन-२०२९७०१००४ email- suraj@parisar.org, priya@parisar.org आमच्या पेज ला लाईक करा व follow करा
Facebook: #stepwalk.in Instagram: #stepwalk.in twitter: @stepwalk_in