Site Overlay

आम्ही कोण आहोत

STEP : Steps Toward Empowering Pedestrians

Step हा पादचाऱ्यांना एकत्रित आणून त्यांच्या हक्कांसाठी लढणे, संघटीत व कायम मोहीम राबवणारा मंच आहे. शहर हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी पायाभूत सुविधा देण्याबरोबरच पादचाऱ्यांना सन्मान मिळावा यापद्धतीने चालण्याचे शहरात महत्त्व वाढावे याची आम्ही मागणी करतो. सध्या पुण्यात याची सुरुवात होत असली तरी भविष्यात इतर शहरात हि संघटना विस्तृत होईल अशी आशा आम्हाला वाटते.

वाहने वेगाने वाढत आहेत आणि रस्त्यावर त्यांचे वर्चस्व दिसत आहे, तरीही पादचाऱ्यांना शहरात सुरक्षितपणे चालण्याच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी कमी प्रमाणात गोष्टी केल्या जातात.

राष्ट्रीय वाहतूक सर्वकष आराखडा, नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल हेबिटेट, नॅशनल स्मार्ट सिटीज मिशन तसेच पादचार्‍यांच्या सुरक्षिततेविषयी, मार्गदर्शक सूचना व मानदंडांवर आणि पादचारी सुविधांविषयी बोलणारी अनेक पथ डिझाइन मार्गदर्शक तत्त्वे, यासारख्या अनेक धोरणात्मक कागदपत्रे असूनही, वास्तविक सत्य मात्र भिन्न आहे.

वाहनचालकांकडून पादचाऱ्यांचा आदर केला जात नाही आणि पादचाऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारी अधिकारी ही कमी महत्त्व देतात, वाहनचालक आणि पादचारी स्वतः ही याला कमी महत्त्व देतात.

चालणे हा आपला मूलभूत अधिकार आहे आणि आपण सर्वजण कधी ना कधी पादचारी असतोच. पादचाऱ्यांसाठी सुरक्षित, पुरेशा आणि वापरण्यायोग्य सुविधा प्रत्येक रस्त्यावर पुरविल्या जाणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु पादचाऱ्यांची सुरक्षा आणि सुविधा संबंधित सरकारी विभागांकडून नेहमीच दुर्लक्षित केल्या जातात. शहरात अनेक रस्ते आहेत. ज्यांना पदपथ नाहीत व जेथे पदपथ आहेत, त्यावर वाहनचालक दंडात्मक कारवाई होईल माहित असूनही पदपथांवर वाहन चालवितात आणि वाहने पार्क करतात. फुटपाथ हे व्यवस्थित डिझाईन केलेले नाहीत, पुरेसे नाहीत व्यवस्थित देखभाल केली जात नाही, शक्य होईल त्या अडथळ्यांनी अतिक्रमण केलेले असते जसे कि, इलेक्ट्रिक खांब आणि इलेक्ट्रिसिटी बॉक्स, जाहिरातींचे बोर्ड, सुशोभिकरण प्रकल्प आणि स्टॉल्स, इत्यादि.

रस्ता ओलांडणे पादचाऱ्यांसाठी एक भयानक गोष्ट बनली आहे, जे अत्यंत चपळ नाही अशा एखाद्यासाठी अशक्यतेची सीमा आहे.

राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरण पादचारी हक्कांविषयी बोलते परंतु वास्तवात जमिनी स्तरावर ते रहदारी, गर्दीमुक्ती आणि पार्किंगच्या समस्या इ; यांचे वर्चस्व दिसते. अशा परिस्थितीत पादचाऱ्यांनी त्यांच्या शहरांमध्ये सक्रियपणे चालण्यासाठीच्या सोयी सुविधांची मागणी करणे महत्त्वपूर्ण बनले आहे. हे एक व्यासपीठ आहे जेथे शहरांना पादचारी अनुकूल करण्यासाठीच्या चळवळीमध्ये लोक सहभागी होऊ शकतात.

आम्हांला काय हवे

पादचारी स्नेही शहर बनवणे.

आम्ही काय करणार आहोत

पादचाऱ्यांशी संबंधित प्रश्नांवर पादचाऱ्यांनी एकत्र येऊन काम करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करणे आणि त्यांना त्यांच्या हक्कांसाठी, सुरक्षित आणि चांगल्या पादचारी सुविधांसाठी लढा उभारण्यासाठी सक्षम बनवणे.

ध्येय

  • पादचाऱ्यांना त्यांचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी व्यासपीठ तयार करणे
  • पादचाऱ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे
  • पादचारी लोकांना संघटनेत सामील करून मजबूत दबाव गट तयार करणे
  • संबंधित अधिकाऱ्यांकडे पादचाऱ्यांचे प्रश्न उपस्थित करणे
  • भागधारकांसह नेटवर्क आणि युती
  • प्रवासाचा मार्ग म्हणून – शहरात चालण्याला प्रोत्साहन देणे

उपक्रम

  • जागरूकता आणि एकत्रीकरण मोहिमा.
  • सरकारी अधिकाऱ्यांची क्षमताबांधणी करणे.
  • भिन्न भागधारकांसह प्रतिबद्ध राहणे.
  • संशोधन आणि पाठपुरवठा करणे.

पादचार्‍यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत चिंतेचा विषय आहे कारण पादचार्‍यांना बेपरर्वाईने वाहन चालविणाऱ्यांकडून त्रास सहन करावा लागतो. जरी माध्यमे आणि बर्‍याच संस्थांमुळे रस्ता सुरक्षिततेबद्दल बोलले जात असले तरीही पादचाऱ्यांचे प्रश्न त्यांच्या चर्चेच्या टेबलावर आलेल्या नाहीत. शहरांमध्ये महत्त्वाची ठिकाणे ती आहेत जिथे पायी चालत एकत्र जमता येतं – जसे कि रस्ते, बगीचे, चौक. हि आपल्या लोकशाहीची ठिकाणे आहेत या ठिकाणांमुळे आपली शहरे हि माणसांना जगण्यायोग्य व राहण्यायोग्य होतात. आपल्या रस्त्यांवर महत्त्वाची जबाबदारी आहे कि चालणाऱ्या सर्वांना वापर करता येईल असे चालण्यायोग्य , सुरक्षित, सोयीस्कर आणि आकर्षित करणारे रस्ते असावेत.

हा एक सर्वव्यापी विषय असला तरी चालणे याबद्दल लोक विचार करत नाहीत किंवा त्यावर बोलत नाहीत. शहरी दळणवळणाची चर्चेमध्ये रहदारी अहवाल, गर्दीतून मुक्तता, पार्किंगची समस्या इ. यांचे वर्चस्व दिसून येते. ट्राफिक चे कायद्यांमध्ये पादचारी हे वाहतूक व्यवस्थेचे घटक आहेत पण वाहतुकीसाठी राष्ट्रीय मानके असलेल्या (राष्ट्रीय वाहतूक धोरण, शहर स्तरावर वाहतूक धोरण) पादचाऱ्यांना वाहतुकीच्या व्यवस्थेत दुय्यम मानतात आणि सर्वांना सुलभ रीतीने वापर करता यावा याऐवजी सुरक्षिततेला जास्त महत्त्व दिले जाते. म्हणूनच पादचाऱ्यांच्या हक्कांबद्दलचे स्पष्ट शहाणपण आणि पादचारी प्रणालींच्या डिझाइनसाठी उत्कृष्ट पद्धती (पदपथ, रस्ता क्रॉसिंग इ.) अद्याप आपल्या शहरांमध्ये पूर्णपणे दिसून आले नाही.

पादचाऱ्यांना सहभागी करून शहरांना पादचारी स्नेही शहर बनवणे व पादचाऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणे हे STEP चे उद्दिष्ट आहे.