पुण्यातील ‘स्वतंत्र’ नाटक गटाच्या वतीने राष्ट्रीय पादचारी चर्चासत्रामध्ये पथनाट्य सादर करण्यात आले. दचाऱ्यांच्यामध्ये त्यांच्या समस्या, अधिकार आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवावा याची जागरुकता हाच पथनाट्याचा हेतू होता. त्यांचा हक्क विचारणे, चालण्यायोग्य शहरे तयार करण्यासाठी संघटित पद्धतीने एकत्र येऊन एक महत्त्वपूर्ण दबाव गट बनणे ही पथनाट्याची मुख्य कल्पना होती.